लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : इंडियन अॅडव्होकेट्स मल्टी-स्टेट मल्टी-पर्पझ सोसायटी ली. मुंबई, जिल्हा वकील संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराचा समारोप करण्यात आला.यावेळीे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. गणेश ढाले यांनी प्रास्ताविक केले. विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आज 'टॉपर-७७७ चालू घडामोडी' या महत्त्वपूर्ण विषयाव लेखन करणारे प्रा. इद्रिस पठाण यांनी चालू घडामोडी विषयाचे महत्त्व व अभ्यास पद्धतीवर मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित मार्गदर्शक प्रा. संजय खंडारे, प्रा. गणेश गाडे, प्रा. भास्कर राठोड, प्रा. इद्रिस पठाण, प्रा. गजानन पांढरे, मैदानी प्रशिक्षक प्रा. गणेश राठोड यांचा सत्कार केला. तर सर्व विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तक वाटप केले.भारतीय विधिज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. सतीश देशमुख यांनी आभार मानले. यावेळी हिंगोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. एन. अग्रवाल, अॅड.दीपक देशमुख यांच्यासह जिल्हाभरातून आलेली वकील मंडळी उपस्थित होती.
स्पर्धा परीक्षा शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:49 AM