हिंगोली : येथील जिल्हा परिषद कार्यालय प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी हराळ यांच्या अरेरावी व उद्धटपणाच्या कारभाराला कंटाळून माध्यमिक शिक्षक संघाने त्यांचा माध्यमिक आस्थापना पदभार बदलण्याची मागणी १६ सप्टेंबर रोजी संघटनेचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे केली.यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही. पी. फुलतांबकर व जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सांगळे व पदाधिकाऱ्यांनी वरील मागणीसंदर्भात शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्यासोबत चर्चा करून निवेदन दिले. शिक्षणाधिकाºयांनी संबंधित अस्थापना कर्मचारी हराळ यांचा टेबल बदलून लवकरच दुसºया कर्मचाºयाकडे सोपविला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच शिष्टमंडळाने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन दिले. त्यानंतर जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे यांची भेट घेऊन तक्रार केली असता त्यांनी या तक्रारीची दखल घेतली. शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांचीही भेट घेऊन तक्रारी केली. यावेळी शाळेतील माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सांगळे, माधव घ्यार, डी.झेड. मुसळे, अशोक सुरवसे, अंजली आडगावकर, भाजीभाकरे, विश्वास क्षीरसागर, बाळासाहेब देशमुख, एस. बी. पुराणिक, माबुद सय्यद, जी. पी. मंदाडे, जी. एन. खडसे, जी. के. शिसोदे यांच्यासह माध्यमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय पोषणच्या कर्मचाऱ्याची केली तक्रार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:43 PM