शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

‘बांधकाम’ची ११२ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:03 AM

यंदा जीएसटीमुळे बांधकाम विभागाच्या विविध कामांना बे्रक लागला होता. त्यातच गेल्यावर्षीचीही काही कामे निविदांना झालेल्या विलंबामुळे प्रभावित झाली होती. आता जुनी व नवी अशी दोन्ही प्रकारची कामे करताना दमछाक होत असून तरीही १२ कोटींची कामे पूर्ण करण्यात यश आले आहे. ४.८५ कोटी शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा जीएसटीमुळे बांधकाम विभागाच्या विविध कामांना बे्रक लागला होता. त्यातच गेल्यावर्षीचीही काही कामे निविदांना झालेल्या विलंबामुळे प्रभावित झाली होती. आता जुनी व नवी अशी दोन्ही प्रकारची कामे करताना दमछाक होत असून तरीही १२ कोटींची कामे पूर्ण करण्यात यश आले आहे. ४.८५ कोटी शिल्लक आहेत.हिंगोली जिल्हा परिषदच नव्हे, तर राज्यात सर्वत्रच बांधकामाच्या कामांना जीएसटीच्या निर्णयानंतर ब्रेक लागला होता. अनेक निविदांमध्ये साहित्याला लागणाºया जीएसटीमुळे मोठी वाढ झाली होती. त्यामुळे कंत्राटदार निविदाच भरायला तयार नव्हते. त्यामुळे यावर्षी निविदा प्रक्रिया करायलाही मोठा विलंब झाला होता. डिसेंबरअखेरपर्यंत यासाठी कोणतीच हालचाल होताना दिसत नव्हती. यात शासनाकडूनही ठोस निर्णय येत नसल्याने अधिकारी व पदाधिकारीही हतबल झाले होते. मात्र त्यानंतर शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना आल्या. त्यानुसार निविदांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया जि.प.त गतिमान पद्धतीने करण्यात आली. जिल्ह्यात विविध भागांचा समतोल राखताना अतिशय कमी किमतीची व मोठी कामेही घेतली जातात. त्याचबरोबर जि.प.सदस्य आपल्या भागात काम खेचून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कामांची संख्याही मोठी असते. यात अंदाजपत्रके बनविताना दमछाक झाली. रस्ते मजबुतीची ६५ पैकी ४४ कामे पूर्ण तर २३ सुरू आहेत. यात गतवर्षीचे ८.५२ पैकी ७ कोटी खर्च झाले. तर यंदाचे २.६६ कोटी नियोजनातच आहेत. आदिवासी उपयोजनेत ७ पैकी ४ पूर्ण झाले आहेत. गतवर्षीचे ३७ लाख खर्च यंदाचे ८४ लाख प्राप्तच नाहीत. पर्यटन स्थळ विकासाची २ कामे अजून रखडलेलीच आहेत. एक पूर्ण झाले. ३५ पैकी ११ लाख शिल्लक आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची २ कामेही अपूर्णच आहेत. यात गतवर्षीचे ४३.९१ शिल्लक व यंदाचे ५0 लाख मंजूर आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांची १४ पैकी ६ कामे पूर्ण तर ८ कामे अपूर्ण आहेत. यात १९ लाख खर्च व १८ लाख शिल्लक आहेत.यात्रास्थळ विकासाच्या ५0 कामांपैकी केवळ ३0 कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तर २0 कामे शिल्लक आहेत. यात १.७१ कोटीपैकी ७१ लाख शिल्लक तर यंदाची तरतूद २.६३ कोटी आहे. आमदार स्थानिक विकास निधीतील ३७ कामे जुनी व नवीन ७ आहेत.यातील २२ कामे पूर्ण झाली. तर २२ अपूर्ण आहेत. यात १.१0 कोटी खर्च झाला. खासदार निधीत ५ पैकी ४ कामे पूर्ण झाली. १७.३२ लाखांचा खर्च झाला. माध्यमिक शाळांची तीन कामे सुरू आहेत. १.५८ कोटी खर्च झाला. यंदा १.४0 कोटी मंजूर आहेत.बांधकाम विभागाचे विविध योजनांमध्ये २0१६-१७ या आर्थिक वर्षात १६.३६ कोटी अखर्चित होते. तर २0१७-१८ मध्ये ९.५९ कोटींची मंजुरी मिळाली. १२.0६ कोटीच खर्ची पडले. उर्वरित शिल्लक आहे.