लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.भटक्या जमातींच्या वस्तीच्या विकासासाठी शासनाने ही योजना आणली आहे. यामध्ये जिल्ह्याला गतवर्षी केवळ ५0 लाखांचाच निधी मंजूर होता. शेवटच्या टप्प्यात आणखी एक कोटी मिळाल्याने निदान यात ३४ कामे घेणे शक्य झाले.दरवर्षीच या योजनेतील कामे संथगतीने होतात. शिवाय प्रस्तावही वेळेत येत नाहीत. यंदाही या योजनेसाठी सध्या तरी ५0 लाखांचा निधी उपलब्ध आहे. मात्र अजून प्रस्तावांची तयारी समाजकल्याण विभागाकडून सुरू असल्याचे दिसत नाही. दरवर्षीच मार्च एण्डच्या तोंडावर या योजनेचे नियोजन केले जाते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हे नियोजन वेळेपूर्वी केले तर फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा हा निधी तसाच वाया जाण्याची भीतीही नाकारता येत नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचना देण्याची गरज असून त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच गावनिवड होते.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत मंजूर गतवर्षीच्या ३४ पैकी ४ कामे पूर्ण झाली. त्यासाठी १ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामवसेकांना देण्यात येतील, असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले. यामध्ये रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, सेवा भवन इत्यादीची कामे करता येतात. यंदा अशा पद्धतीची कामे सुरू आहेत. तर पुढील कामांसाठी अंदाजपत्रके जसे येतील प्रस्ताव सादर केले जातील, असेही सांगण्यात आले.
तांडा-वस्ती सुधारची ४ कामेच पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:22 AM