शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

हिंगोली जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:48 AM

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह विविध विरोधी पक्षांनी हिंगोली जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरात तर दुपारपर्यंतच बंद यशस्वी झाला. त्यानंतर व्यवहार सुरळीत झाले होते. वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, जवळा बाजार आदी ठिकाणीही हा बंद पाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह विविध विरोधी पक्षांनी हिंगोली जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरात तर दुपारपर्यंतच बंद यशस्वी झाला. त्यानंतर व्यवहार सुरळीत झाले होते. वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, जवळा बाजार आदी ठिकाणीही हा बंद पाळण्यात आला.हिंगोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने महागाईच्या निषेधार्थ बंद पुकारून मोर्चा काढला होता. यामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाय वसमत येथेही बंदला प्रतिसाद मिळाला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. औंढा, सेनगाव, कळमनुरी, सेनगावातही बंदला प्रतिसाद मिळाला. हिंगोलीत मोर्चात आ.रामराव वडकुते, आ.संतोष टारफे, संजय बोंढारे, मुनीर पटेल, दिलीप चव्हाण, अ‍ॅड. गयबाराव नाईक, श्यामराव जगताप, माधव कोरडे, भागोराव राठोड, जावेद राज, नेहालभैय्या, मामूद बागवान, आरीफलाला, बी.डी. बांगर, विनोद नाईक, शे नारायण खेडेकर, अमोल देशमुख, मधुकर मांजरमकर, विशाल गोटरे, संतोष गुट्टे आदी सहभागी होते.सेनगाव : बंद पाळून दिले निवेदनसेनगाव : महागाईविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला सेनगाव शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने आज दिवसभर कडकडीत बंद होती. इंधन दरवाढ, महागाईविरोधात पुकारलेल्या भारत बंदला शहरासह तालुक्यात मोठाप्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व, लहान, मोठे व्यवसाय दिवसभर कडकडीत बंद होते. दुपारपर्यंत शहरातील पेट्रोलपंपही बंद होते. तहसीलदारांना महागाईच्या विरोधात निवेदन देवून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.सेनगावात निवेदन देताना विनायक देशमुख, आप्पासाहेब देशमुख, सतीश खाडे, डॉ. नीळकंठ गडदे, कैलास देशमुख, अशोक सरनाईक, नगरसेवक उमेश देशमुख, विठ्ठल शिंदे, सचिन देशमुख, अजय विटकरे, अमरदीप देशमुख आदी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.वसमतमध्ये प्रशासनास निवेदन सादरवसमत : येथील शहर काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबर रोजी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून होणाºया भरमसाठ इंधन भाववाढीच्या निषेधार्थ शहरातील झेंडा चौकातून सरकारविरोधी फलकांसह सायकल व रिक्षांचा मोर्चा काढून उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देत कडकडीत बंद पाळण्यात आला.सरकारकडून गेल्या चार वर्षांत सामान्य माणसाच्या पिळवणुकीसह त्यांचा कोणताही विचार न करता शासनाला परवडेल, अशा पद्धतीने निर्णय घेऊन भाववाढ केली जात आहे. या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले असून त्यांच्या जीवनाचे आर्थिक नियोजन बिघडले असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सरकार जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्णत: अपयशी ठरत असून सामान्य जनतेचा विचार करून सरकारने मार्ग काढावा व सामान्य जनतेला न्याय द्यावा. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही या सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आमची सर्व कामे व दुकाने बंद ठेवून सरकारचा जाहीर निषेध करत आहोत अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना दिले आहे.कळमनुरीत अल्प प्रतिसादकळमनुरी : येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह विरोधी पक्षांच्या वतीने महागाईविरोधात भारत बंदची हाक दिली होती. शहरातील ७0 टक्के व्यापाºयांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.यावेळी नवीन बसस्थानक परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करत सरकारविरोधी घोषणा दिल्या. तर मनसेच्या वतीने बसेस बंद केल्या. नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोढारे, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, बंडू पाटील, मनसेचे विनोद बांगर, रा.काँचे शिवाजी पाटील पुयणेकर, अ‍ॅड.कादरी, नगरसेवक निहाल कुरेशी, अरूण वाढवे, केशव नाईक, भगवान खंदारे, संजय वाढवे, सादेक नाईक, हमीदुल्ला पठाण, अजम बागवान, बबलू पठाण, सुधाकर पाईकराव, बबन डुकरे,तय्यब नाईक, सादेक पठाण आदी उपस्थित होते.आखाडा बाळापूर येथे कडकडीत बंदआखाडा बाळापूर : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला आखाडा बाळापूर येथे प्रतिसाद मिळाला असून बाळापूरची व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी व्यापारपेठेत पदयात्रा काढली.पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या वाढत्या आलेखामुळे महागाईत प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. त्या हाकेला आखाडा बाळापूर येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, असद कादरी, सरपंच मोहम्मद जिया कुरेशी, उपसरपंच विजय बोंढारे, जि. प .सदस्य भगवान खंदार, युवा नेते दत्ता बोंढारे, चंद्रकांत डुकरे, चंद्रकिशोर घोडगे, प्रवीण बयास, ओमकार अमाने, संदीप नरवाडे, गजानन देशमुख, नामदेव बोंढारे, दादाराव बोंढारे, वैजनाथ हेंद्रे, कपिल तेलावर, श्रीयश पिंपरकर, रुपेश अग्रवाल, कुशल अग्रवाल, मोहम्मद गौस, पांडुरंग बोंढारे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाºयांनी शहरातून पदयात्रा काढून व्यापाºयांना बंदचे आवाहन केले.औंढ्यात बंदला मोठा प्रतिसादऔंढा नागनाथ : महागाईविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला औंढा शहरात मोठा प्रतिसाद मिळाला.सकाळी ११ वाजता जुने बसस्थानकात काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमा होवून बाजारपेठेत बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर व्यापाºयांनी सदरील दुकाने बंद ठेवली होती. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी दीडच्या सुमारास तहसील कार्यालय गाठून तहसीलदार पांडुरंग माचेवाड, वैजनाथ भालेराव यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे पिंपळदरी फाट्यावर काही कार्यकर्त्यांनी हिंगोली-औंढा राज्य महामार्गावर टायर जाळून निषेध नोंदविला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल, तालुकाध्यक्ष संजय दराडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, सुमेध मुळे, जावेद इनामदार, माणिकराव पाटील, शेख असद छोटू भाई, नगरसेवक शकील अहमद, बाळासाहेब देशमुख, जियाओद्दीन इनामदार, गणेश देशमुख, ममलेश देशमुख, नंदकुमार पाटील, डॉ सफी काजी, प्रवीण टोम्पे, महेंद्र जोंधळे, बबन मालवटकर, जुल्फिकार इनामदार, अलीमोद्दीन खतीब, गजानन सांगळे, संतोष नाईक, धम्मदास पुंडगे, प्रेमदास चव्हाण, नदीम पिंजारी, राहुल नागरे, फारूक सॉमिल, महेंद्र मूळे, सय्यद फारूक, ताहेरखान पठाण, आरेफ लाला आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीBharat Bandhभारत बंद