शिरड शहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील सरपंच नंदा बालाजी ठोंबरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करणे व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, त्यामुळे १० सदस्यांनी ९ मार्च रोजी औंढा तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
शिरड शहापूर येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण १५ सदस्य आहेत. त्यापैकी २ सदस्याचे निधन झाले. तर १ सदस्य अपात्र ठरला आहे. यादरम्यान शिरड सरपंचांनी १४ व्या वित्त आयोगातील १ कोटी ३६ लाखांच्या कामातील अनियमितता, देयक मंजुरी व स्वाक्षरी करण्यास वेठीस धरणे, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खोट्या तक्रारी करून बदली करणे, ग्रा.प. सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, तसेच पदाचा दुरुपयोग करून पती बालाजी ठोंबरे कारभार पाहत असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास राहिला नाही.
यासर्व बाबीमुळे येथील उपसरपंचासह ९ ग्रामपंचायत सदस्यांनी औंढा तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर उपसरपंच सय्यद कुतुब, सिताराम गजभार, नागनाथ अतेंवार, विजय शिवराम रावले, शमशाद बेगम रिजवान बेग, शाहिदा बेगमगुलाब नबी, शिवकांता निळकंठ आकमार, अनिता पंडितराव जोगदंड, समीना बेगम उमर खा पठाण, पूजा मुक्तीराम वाहटुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.