लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागापासून शहरापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सुसंवाद व संघटित राहण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरुवात केलेल्या शक्ती अॅपच्या सदस्य नोंदणी अभियानास हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने आज प्रारंभ करण्यात आला.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षनेतृत्वाशी थेट संपकार्साठी शक्ती प्रोजेक्ट सुरू केला आहे. नोंदणीस शहरात तोफखाना भागातून प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष बापूराव बांगर तर उद्घाटक न.प. गटनेते शेख नेहाल उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अनिल नैनवाणी, आरेफ लाला, विलास गोरे, जुबेर मामु यांची उपस्थिती होती.यावेळी नेहालभैय्या म्हणाले, यांनी काँग्रेसची सर्वात मोठी ताकद म्हणजे कार्यकर्ता आहे. जो प्रत्येक गाव, शहर, तालुका जिल्हात असून सर्व कार्यकर्त्यांना शक्तीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम होणार आहे. त्याचा आवाज व विचार ऐकायचे आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सचिन पोले, सय्यद कलीम, ज्ञानेश्वर सातव, लखन सांगळे, राघोजी भुरके, शासन कांबळे, शंकर पारसकर, सय्यद इरफान, उबेद पठाण, आशिष पुंडगे, लखन खंदारे, प्रेम लोखंडे, आदीत्य तोगरल्लु, सुधाकर सावळे, अतिक फारुखी, राजु पाईकराव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक जुबेर मामू यांनी केले. तर बन्टी नागरे यांनी आभार मानले.
काँग्रेसची शक्ती अभियान नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:44 AM