दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:34 PM2018-10-21T23:34:23+5:302018-10-21T23:34:47+5:30

काल खा.राजीव सातव यांनी जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या बैठकीस माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी दांडी मारली होती. रविवारी गोरेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेत वेगळे नियोजन केले. तर या यात्रेतील सभेच्या ठिकाणावरूनही वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.

 Congress meeting in Hingoli on the next day | दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत काँग्रेसची बैठक

दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत काँग्रेसची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : काल खा.राजीव सातव यांनी जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या बैठकीस माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी दांडी मारली होती. रविवारी गोरेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेत वेगळे नियोजन केले. तर या यात्रेतील सभेच्या ठिकाणावरूनही वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी राज्यभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेनिमित्त २७ आॅक्टोबरला ते हिंगोली जिल्ह्यात दोन सभा घेणार आहेत. शनिवारी खा.राजीव सातव यांनी हिंगोलीत पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांनी या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जनसामान्यांना सोबत घेवून मैदानात उतरण्याचे आवाहन केले. तर रविवारी माजी आ.भाऊ पाटील यांनी निवासस्थानी बैठक घेतली. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. एकप्रकारे हा शक्तीप्रदर्शनाचाच प्रकार होता. मात्र यात अंतर्गत गटबाजीवरून टीका-टिपण्णी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. गोरेगावकर यांनी मात्र केवळ भाजपवरच आसूड ओढले. अंतर्गत वादाच्या मुद्यावर कोणीही आपल्या भाषणात लवलेशही दाखविला नाही. गोरेगावकर म्हणाले, कार्यकर्तेच माझी शक्ती असल्याने या शक्तीच्या जोरावरच मी पक्षाचे काम करतो.
मराठवाड्याचे भूमिपुत्र अशोक चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले. तर केंद्र व राज्य शासनासह स्थानिक आमदारांवर जोरदार टीका केली. भाजपाचे सरकार केवळ बोलघेवडे असून, शेतकºयांसह व्यापारी, शेतमजूर अडचणीत आहे. वीज रोहित्र मिळत नाही, कर्जमाफी, पीककर्ज, पीकविम्यासारख्या अनेक समस्या भेडसावत असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. इंधन दरवाढ झाली. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था ढासळली, कर्जमाफी नेमकी कुणाला भेटली, हे कळायला मार्ग नाही.
या बैठकीस हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशंचद्र बगडीया, ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा, सावरमल झुनझुनवाला, जि.प.चे शिक्षण सभापती भैय्या देशमुख, दाजीबा पाटील, बाजीराव इंगोले, भीमाशंकर सराफ, गजानन पोहकर, व्दारकादास सारडा यांची उपस्थिती होती. तर सुनील पाटील, देवराव जाधव, प्रकाश देशमुख, रुपाजी कºहाळे, कांतराव हराळ, अ‍ॅड. अरगडे, नजीर अहेमद, देवराव जाधव, ज्ञानेश्वर गोटरे, सुमित चौधरी, मिलींद उबाळे, समीर भिसे, निरज देशमुख, अशोक चव्हाण, केशव दुबे आदी उपस्थित होते.

Web Title:  Congress meeting in Hingoli on the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.