लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : खा.राजीव सातव यांना गुजरातमध्ये झालेल्या मारहाण व अटकेच्या घटनेमुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचे तीव्र पडसाद दुस-या दिवशीही उमटत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुसºया दिवशी ४ डिसेंबर रोजी निषेध करत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. भाजप सरकार दडपशाहीचा वापर करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांतून केला जात आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून सध्या खा. राजीव सातव जबाबदारी पार पाडत आहेत. काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम राजकोट येथील निवडणुकीची जबाबदारी सातव यांच्यावर दिली आहे. तेथील मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार यांच्या झालेल्या पोस्टरबाजीवरून राजगुरू यांना अटक केली. त्यांची विचारपूस करण्यासाठी खा. राजीव सातव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की व मारहाण केली. सदर घटनेचा काँग्रेस पक्षातर्फे हिंगोलीत काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. सत्ताधारी सरकार व गुजरातमधील पोलीस प्रशासनाचा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही, संबधितांवर कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.निवेदनावर आ. संतोष टारफे, काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, समाजकल्याण सभापती सुनंदा नाईक, बाबा नाईक, शामराव जगताप, बापूराव बांगर, डॉ. रवि पाटील, विनायक देशमुख, धनंजय पाटील, रमेश जाधव, दिलीप देसाई, शे. कलीम, डॉ. सतीश पाचपुते, माणिक देशमुख, भागोराव राठोड, अरूण वाढवे, रवि कोकरे, गणेश काटकर, आनंद पारडकर, देविदास ससाल, हरिभाऊ झाकलवाडे, यांच्यासह पदधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.सेनगाव : काँग्रेसचा रास्ता रोकोसेनगाव : खा. राजीव सातव यांना गुजरात येथे पोलिसांकडून झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ सेनगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी रास्तारोको करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तहसीलला निवेदन दिले.
दुस-या दिवशीही काँग्रेसतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:55 PM
खा.राजीव सातव यांना गुजरातमध्ये झालेल्या मारहाण व अटकेच्या घटनेमुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचे तीव्र पडसाद दुस-या दिवशीही उमटत आहेत.
ठळक मुद्देहिंगोली : जिल्हा कचेरीसमोर धरणे