लोकमत न्यूज नेटवर्ककन्हेरगावनाका (जि.हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पुलावर काम करणाºया मजुरांचा पैशांच्या उचलीवरून वाद झाला. यात हाणामारी झाल्याने ठेकेदाराने मजुरांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार करून पिस्तूलने मारहाण केल्याने दोघे जखमी झाल्याची घटना १० आॅक्टोबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.या घटनेमध्ये संजयकुमार निषाद (३८) आणि हरिप्रसाद निषाद (४0, गडसोनी, उत्तर प्रदेश) हे दोन मजूर जखमी झाले आहेत. या वादावादीच्या आवाजानंतर गोळीबार झाल्याने विनोद रामचंद्र गावंडे या शेतकºयाने पोलीस चौकीत माहिती दिली. जखमी मजूर जागीच होते, तर उर्वरित मात्र ठेकेदाराचा रौद्रावतार पाहून पळून गेले. पोलीस निरूक्षक विश्वनाथ झुंजारे, सचिन इंगोले, विजय महाले, जमादार साहेबराव राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संतोषसिंग आसारामसिंग सानप (३२, कलखेडा, भोपाळ) आणि रवीकुमार किशनप्रसाद (२८, भोपाळ) यांच्यासह एक पिस्तूल ताब्यात घेतले. सदर आरोपीतानी दोन गोळ्या उडविल्या असून उर्वरित गोळ्यासह पिस्तूल ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.जी.खान यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. निवडणूक आचारसंहितेमुळे एकीकडे जिल्ह्यातील शस्त्रे जमा करून घेतली असताना गोळीबार झाल्याची वार्ता पसरल्याने सगळेच हैराण होते, मात्र कंत्राटदारव मजुरांतील वाद असल्याचे समोर आले.
कनेरगावात ठेकेदाराचा हवेत गोळीबार; मजुरांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:29 AM