शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

घरफोडीच्या ७ गुन्ह्यात शिक्षा भोगली; बाहेर येताच चोरट्याने पुन्हा वकीलाचे घर फोडले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 21, 2024 5:53 PM

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले; मुद्देमाल केला जप्त

हिंगोली : मराठवाडा व विदर्भात ५० वर्षाच्या काळात २५ ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. विशेष म्हणजे घरफोडीच्या ७ गुन्ह्यात  कारवासाची शिक्षाही त्याने भोगली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा त्याने हिंगोलीत एका वकिलाचे घर फोडले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास कुंडलिक भगत (वय ६०,रा. भेंडगाव ता. बार्शी टाकळी जि. अकोला) असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे.  हिंगोली शहरातील अजयनगरात एका वकिलाच्या घरी २ जानेवारी २०२४ रोजी चोरीची घटना घडली होती. या घटनेतील चोरट्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थागुशा पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला होता. २१ मे रोजी हे पथक गस्त घालत होते. 

यावेळी वकीलाच्या घरी चोरी केलेला चोरटा हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने रेल्वे स्टेशन परिसर गाठत हरिदास कुंडलिक भगत यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला लोखंडी चाकू, रॉड, स्क्रु ड्रायव्हर, बॅटरी, गुलेर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

दरम्यान, हरिदास भगत याने मागील ५० वर्षात विदर्भ व मराठवाड्यात अनेक घरफोड्या केल्या. जवळपास २५ घरफोड्यांचे रेकॉर्ड पोलिसांना उपलब्ध झाले आहे. तसेच न्यायालयाने त्यास आतापर्यंत ७ घरफोड्यांमध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. कारावास भोगून आल्यानंतर पुन्हा तो घरफोड्या करीत होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी