लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. यातच परप्रांतीय फेरीवाले सामान विक्रीसाठी गावात येत असल्याने त्यांच्यावर संशय घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जातआहे. त्यामुळे या गावांत फेरीवाल्यांना अघोषित बंदीच घातल्याचे चित्र आहे. अशा संशयित चौघांवर पोलिसांनी कारवाई केली.आखाडा बाळापूर परिसरात मागील काही दिवसांपासून सतत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. बाळापूर पोलिसांना चोरट्यांचा माग लागत नाही. चोरट्यांच्या सक्रियतेमुळे ग्रामस्थ भयभीत आहेत. दरम्यान, कांडली, आडा गावात झालेल्या चोरीच्या घटना बाळापुरात भरदिवसाची घरफोडी याचा संबंध केस विकत घेणाºयांशी जोडला जात आहे.आंध्र प्रदेशची पासिंग असलेल्या तीन दुचाकीस्वारांशी याचा संबंध असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यामुळे गावागावात विविध साहित्य विक्रीसाठी येणारे परप्रांतीय विक्रेते ग्रामस्थांच्या हिट लिस्टवर आहेत.८ जानेवारी २0१८ रोजी भोसी येथे साडी विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना ग्रामस्थांनी संशयावरून मारहाण केली. तसेच पोलिसांच्या स्वाधिन केले. तर दुसºयाच दिवशी दाती येथे चादर विक्रीसाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली गेले. या चारही जणांवर बाळापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकंदरीत यामुळे फेरीवाल्यांना अघोषित गावबंदी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वारंग्यात फोडले देशी दारुचे दुकानवारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील देशी दारूचे दुकान फोडून ३२ हजार ४४८ रुपयांच्या तेरा पेट्या दारूची चोरी केल्याची घटना घडली आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना एकापाठोपाठ सुरूच आहेत. २१ नोव्हेंबरलाच डोंगरकडा येथे देशी दारूचे दुकान फोडले होते. दारूसह इतर साहित्य असा एक लाखाचा ऐवज चोरीला गेला होता. आता पुन्हा वारंगा फाटा येथे दुकानावरील टीनपत्रे काढून देशी दारूच्या तेरा पेट्या पळविल्या. या दारूची किंमत ३२ हजार ४४८ रुपये एवढी आहे. चंदू केशवराव कदम यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अनेक खेड्यांमध्ये चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त सुरू झाली असताना राष्ट्रीय महामार्गावरील गावात होत असलेल्या या प्रकारामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
चोरीच्या दहशतीमुळे फेरीवाल्यांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:02 AM