हिंगोली जिल्ह्यात २७ मे रोजी ६७३ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी ९ बाधित आढळले. यात हिंगोली परिसरात सरस्वतीनगर १, सवना २ असे तीन रुग्ण आढळले. वसमत परिसरात १२९ पैकी एकही बाधित नाही. सेनगाव परिसरात ८८ पैकी सेनगावात एक बाधित आढळला. औंढा परिसरात ११४ पैकी जडगावला तीन व हिवरा जाटू येथे एक बाधित आढळला. कळमनुरी परिसरात २१५ पैकी माळधामणीत एक बाधित आढळला. आरटीपीसीआर चाचणीत बेलवाडी २, करंजाळा १, जिजामातानगर १, नवीन पोलीस वसाहत ४, नवलगव्हाण १, काकडधाबा १, येहळेगाव सोळंके १, हुनमानगर २, एनटीसी २, हिंगोली १, खंडाळा १, नवीन मोंढा २, खुशालनगर १, शिवाजी चौक औंढा १, उटी, साखरा १, पाझरतांडा १, हिवरा १, नाईकनगर १, गंगानगर १, एनटीसी १ असे २८ रुग्ण आढळले. औंढ्यात एक रुग्ण आढळला. कळमनुरी परिसरात वाकोडी २, कळमनुरी १, वारंगा १ असे चार रुग्ण आढळले. सेनगाव येथे तीन रुग्ण आढळले. वसमत परिसरात तेलगावात तीन रुग्ण आढळले. आज बरे झालेल्या ८० जणांना डिस्चार्ज दिला. यात जिल्हा रुग्णालयातून ४२, कळमनुरी ८, औंढा ८, सेनगाव ६, वसमत ८, लिंबाळा ८ यांचा समावेश आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात १५,५५९ रुग्ण आढळले तर १४,७७९ बरे झाले. सध्या ४३० जणांवर उपचार सुरू असून ३५० जणांचा मृत्यू झाला. दाखल असलेल्यांपैकी १५० गंभीर रुग्ण ऑक्सिजनवर तर २३ अतिगंभीर बायपॅपवर आहेत.
पाच मृत्यू
जिल्हा रुग्णालयात मंठा, जालना येथील ६५ वर्षीय महिला, सेनगाव येथील ९६ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरुष, भिरडा येथील ५५ वर्षीय महिला असे चार रुग्ण दगावले. तर वसमत उपजिल्हा रुग्णालयात महागाव येथील ६३ वर्षीय महिला दगावली.