पूर्ण काळजी घेवून घरोघर वाटप
कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून आरोग्य विभागाकडून आशा, अंगणवाडीताईंमार्फत या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी १ ते २ वर्षांचे २३०११, २ ते५ वर्षांचे ६७८५४, ६ ते१९ वर्षांचे विद्यार्थी २ लाख४९ हजार ६३२आहेत. तर शाळाबाह्य ७५७२ जण आहेत. या सर्वांसाठी ३.३६ लाख गोळ्या लागणार आहेत.
२३०० कर्मचाऱ्यांची फौज
यंदा जंतनाशक गोळ्यांचे शाळेत वाटप होत नसल्याने अंगणवाडीताई ११९२, आशा वर्कर १०७०या कामी येणार आहेत. शिवाय ज्या शाळा सुरू राहतील, तेथे शिक्षकांमार्फत वाटप होईल. तसेच यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रणासाठी ४५ अधिकाऱ्यांचे पथकही राहणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्याने संचारबंदी लागू झाल्याने हे वाटप लांबले. ८ मार्चनंतर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य उपसंचालकांनाही याबाबत कळविण्यात आले होते.
-डॉ.शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली