हिंगोली जिल्ह्यात रॅपिड अँटिजन चाचणीत वसमत ५, कळमनुरी ६६, सेनगाव ६७, औंढा १० अशी एकूण १४८ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली १५, वसमत २९, औंढा ७० अशी एकूण ११४ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. शनिवारी सेनगाव येथील एका ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ३९३ वर पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्याच खूप कमी झाल्याने मृत्यूचे सत्रही घटलेले आहे. मात्र, या वृद्धाच्या मृत्यूने पुन्हा एकाची भर पडली आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १६ हजार ३३ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ६३७ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर सध्या ३ सक्रिय रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील कोरोना वाॅर्डात उपचार सुरू आहेत.
सण, उत्सवाच्या दिवसांत नागरिकांनी जास्त गर्दी करू नये. त्यामुळे गर्दी केल्यास पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.