जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ५२, औंढा ३३, वसमत १५२, कढमनुरी ५३, सेनगाव ४६ अशा ३३६ जणांची चाचणी करूनही कोणी बाधित आढळला नाही. तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली ७१, औंढा १०१, वसमत २४, कळमनुरी १००, सेनगाव १५२ अशा ४४४८ जणांचे अहवाल प्राप्त झाले; मात्र एकही बाधित नाही. आज बरे झालेल्या एकास सामान्य रुग्णालयातून घरी सोडले.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १५ हजार ९९१ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५८४ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला, तर सध्या २० जणांवर उपचार सुरू आहेत तर आजपर्यंत ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे तर दोन जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण सात जणांची प्रकृती गंभीर आहे.