औंढा नागनाथः सोशल मीडियातून चिकन खाल्ल्याने कोरोन संसर्ग होता असा चुकीचा संदेश व्हायरल होत असल्याने चिकन विक्री मंदावली आहे. एकीकडे चिकनला भाव नाही आणि त्यांच्या पोषणाचा खर्च वाढल्याने पोल्ट्री उद्योग अडचणीत सापडला आहे. याचा फटका तालुक्यातील व्यावसायिकांना बसला असून त्यांनी २१ हजार कोंबडी पिल्लांना जमिनीत गाडले.
तालुक्यातील दरेगाव येथील सुनील जाधव व लक्ष्मण जाधव यांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. मात्र मागील काही दिवसांपासून करोना व्हारसचा संसर्ग चिकन खाल्याने होतो अशी अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यवसाय संकटात आला आहे. एकीकडे बॉयलर चिकन विक्री मंदावली आहे तर दुसरीकडे दर दिवसाला २१ हजार कोंबड्यांना चाळीस हजाराचा खाद्य लागते. यामुळे संकटात सापडलेल्या व्यावसायिकांनी कोंबड्यांना गाडण्याचा निर्णय घेतला.