हिंगोली : राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानंतर, आई जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना युद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
हिंगोली येथील छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी येथे मंगळवारी जिल्हाधिकारी रूचेश जयंवशी, डाॅ.नंदीनी भगत, जिजाऊ ब्रिगेडच्या उपप्रदेशाध्यक्ष ज्योती कोथळकर, छाया मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी जयंवशी यांनी कोरोना कालावधीत सेवा करणारे आरोग्य विभागाच्या महिला डाॅक्टर, अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, सफाई कामगार, पालिका कर्मचारी यांचा सन्मान हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे त्यांचे मनोबल वाढेल असे प्रतिपादन केले. यानंतर, महिला वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ.स्वाती गुंडेवार, डाॅ.शुला जालीब, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सा.अधिसेविका ज्योती पवार, अधिपरिचारिका शितल झरकर, अमिरा गावित, दुर्गा खंदारे, सुनिता जवळे, मीनाक्षी झरकर, शितल बगाटे, क्रांती तपासे, अनुसया वैद्य, दीपाली चने, दीपाली इंगळे, भीमराव खेबाळे, अविनाश कांबळे, परिसेविका वंदना पांचाळ, सफाई कामगार सुनिता भुरे, सविता कराळे, छाया कांबळे, इंदुमती भिसे, सुधाकर वाढवे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर, कोरोनाच्या संकटात मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणारे पालिका कर्मचारी रघुनाथ बांगर, काशिनाथ लगड, नवनाथ ठोबंरे, आकाश गायकवाड, महादेव भुजवणे, शुभम होनमाणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक, आई जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. फाेटाे नं.२६