कोरोना महामारीचे रुग्ण सध्या कमी प्रमाणात आढळून येत असल्याचे पहायला मिळत आहेत. कोरोना आजार ओसरू लागला असला तरी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात साथीच्या रोगाला दूर सारून चालणार नाही. यासाठी आपली आणि परिसराची स्वच्छता ठेवायला पाहिजे. चिकुनगुनिया तर केव्हाच जिल्ह्यातून पळून गेला आहे. २०१७ पासून या आजाराचे रुग्णही कुठे पहायला मिळत नाहीत. आता पावसाळा सुरू झाला आहे. आपल्या परिसरात पाण्याचे डबके साचले असले तर ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा ठिकाणी फवारणी करून घ्यावी. जिल्ह्यात धूर फवारणी यंत्र ३५ असून २४ धूर फवारणी यंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राकडे देण्यात आलेले आहेत. ज्यांना धूर फवारणी यंत्रासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाची साथ कमी झाली; साथराेगांच्या प्रमाणातही घट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:37 AM