जिल्ह्यात रॅपिड ॲंटिजन तपासणीत हिंगोली परिसरात ८१ पैकी जिजामाता नगरात एक रूग्ण आढळून आला. तर सेनगाव परिसरात २८४ जणांची तपासणी केली असता पुसेगाव येथे रूग्ण आढळून आला. तर वसमत परिसरात १२०, कळमनुरी ७७, औंढा नागनाथ परिसरात ११२ जणांची तपासणी केली असता एकही रूग्ण आढळून आला नाही. तर आरटीपीसीआर तपासणीत हिंगोली परिसरात ४५ जणांची तपासणी केली असता येळेगाव, औंढा येथे एक रूग्ण आढळून आला. कळमनुरीत ३५ जणांच्या तपासणीत एकही रूग्ण आढळला नाही.
हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या कळमनुरीतील ६० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ९३७ रूग्ण आढळले असून त्यापैकी १५ हजार ५१४ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३८२ रूग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला ४१ रूग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी २६ जणांची प्रकृती गंभीर आहे.