हिंगोली : जिल्ह्यात ११ आॅगस्ट रोजी २४ नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आजघडीला एकूण २४० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसर ४ व्यक्ती, कळमनुरी ८, वसमत १ व्यक्ती, सेनगांव ४ असे एकूण १७ रुग्ण हे रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर विठ्ठल नगर वसमत १, शास्त्री नगर वसमत १ व्यक्ती, वसमतनगर १, जवळा ता. वसमत १ व्यक्ती, असोलेवाडी ता. कळमनुरी १ आणि सेनगांव शहर २ असे एकूण ७ रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तसेच कारोनामुळे एकाचा मृत्यु झाला असून १० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी ८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना आॅक्सीजन चालू आहे. तर ३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ११ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण ८९७ रुग्ण झाले असून, त्यापैकी ६४७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण २४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिली.