हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर कळमनुरी तालुक्यातील नांदापूर गावात नवीन व्यक्तींना गावबंदी केली आहे. याबाबत २३ मार्च रोजी ग्रामपंचायतने निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेत गावक-यांची बैठक झाली. यावेळी सरपंच देवराव कºहाळे, उपसरपंच संदीप बोरकर, सचिन चव्हाण, अरविंद चव्हाण, आंबादास बोरकर, बळवंत बोरकर, सतीष बोरकर, संजय बोरकर, शिवाजी शिंदे, गुलाब शिंदे, मुकेश जैस्वाल, किशोर ठाकूर यांच्यासह गावक-यांची उपस्थिती होती. गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली असून गावातून बाहेरगावी जाणा-या - येणा-याची व्यक्तींची नोंद करण्यात येत आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचना देण्यात येत असून आवश्यक असल्यास तपासणी केली जात आहे.