हिंगोली : आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही दुकाने उघडी करून कायद्याचे उल्लंघण करणाऱ्या ३१ जणांवर ६ एप्रिल रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अजीवनाश्यक दुकाने चालू ठेवून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने ६ एप्रिल रोजी धडक कार्यवाही करण्यात आली आहे.
हिंगोली शहरातील बिरसा मुंडा चौक ते गांधी चौक परिसर तसेच रिसाला बाजार पर्यंत ठिकठिकाणी रस्त्यालगत अजीवनावश्यक दुकाने चालू ठेवल्याने ३१ जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर परिषदेस शहर अभियान व्यवस्थापन पंडित पुंजाराव मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद मुजीब स. शौकत, सय्यद याकुब स. ताहिर, आखील बिन मोहम्मद, इर्फान सय्यद उस्मान, सुमीत भाऊराव उबाळे, सगीर खान फकीर अहेमद पठाण, खमीरभाई, सागर रमेश मान्य, मनोज शांतीलाल बगडीया, रहिम शेख इसाख, शेख मोबीन शेख एकबाल, बेगमबी शेख मुनीर, शेख कदीर हाजी शेख चाँद साहब, शेख नजीर शेख इसूब, विजय नथुजी गिरी, पठाण मुक्तारखॉन, रौफखॉन आदीमखान पठाण, नर्सींग प्यारेलाल, मख्खन शर्मा, सुशील अग्रवाल, रुपेश उपाध्ये, हारुन बेग, उमरभाई, विनोद पारडे, शेख बबलू शेख बालू, रतन पेंटर, संतोष परसवाळे, किशोर लोलगे यांच्यासह ३१ आस्थापना धारकांवर गुन्हा केला.
आस्थापना परवाने निलंबनसाठी प्रस्ताव पाठविणारजिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आस्थापना चालू ठेवलेल्या ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या आस्थापनाधारकांवर दुकाने अधिनियमानुसार त्यांचे परवाने निलंबितसाठी प्रस्ताव पाठविणार. - न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील.