हिंगोली : जिल्ह्यात आणखी चौघांचे १८ जून रोजी पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त झाले असून एका रूग्णास डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात २३७ रूग्ण बाधित आढळले असून त्यापैकी २०१ रूग्ण बरे झाले आहेत. तर ३६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे १८ जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील संतुकपिंपरी येथील रहिवासी २३ वर्षीय तरूण असून दुसरा कनेरगावनाका येथील १४ वर्षांचा बालक आहे. तसेच वसमत क्वॉरंटाईन सेंटरमधील २४ वर्षीय तरूण असून तो मुंबई येथून आला होता. तो वसमत येथील बुधवारपेठमधील रहिवासी आहे.
तसचे राज्य राखीव पोलीस दलातील १ जवानाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून सदर जवान मुंबई येथून हिंगोलीत आला. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमधील असलेला जाम येथील रूग्णास डिस्चार्ज मिळाला आहे.