तोंडापूर येथे झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तोंडापूर येथील ग्रामपंचायतीच्या परिसरात असलेल्या एका झोपड्यात पाहणी केली असता तेथे दहा जण गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख ६ हजार ९३० रूपये व ३१ हजार रूपये किमतीचे पाच मोबाईल असा एकूण ३७ हजार ९३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांच्या फिर्यादीवरून गौस खॉ दस्तगीर खॉ पटेल, बालाजी नारायण बंडेकर, पुरभा माधव थोरात, साहेबराव वामन थोरात, गवनाजी संभाजी थोरात, यादेश देविदास थोरात, राजू माधवराव थोरात, सय्यद मुक्तार सय्यद अन्वर, प्रताप इंद्रजीत थोरात, संतोष रामदास थोरात (सर्व रा. तोंडापूर) यांच्याविरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह जी.एच. शेख हे करीत आहेत.
तोंडापूर येथील १० जुगाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM