शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Crime News: पोलीस अधिकाऱ्याची दोन मुले वाँटेड; हिंगोलीत लागले आरोपींचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 4:50 PM

तलवार व रॉडने मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

हिंगोली : तलवार व रॉडने मारहाण करून दोघांना गंभीर दुखापत केल्याची घटना हिंगोली तालुक्यातील बेलवाडी शिवारात २३ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी  गुन्हा दाखल होताच घटनेतील आरोपींनी पळ काढला. शोध घेऊनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी हिंगोलीतील चौकात चार आरोपींच्या वाँटेड बॅनर लटकविले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन आरोपी हिंगोली पोलीस दलातील जमादाराची मुले आहेत.  

हिंगोली तालुक्यातील बेलवाडी शिवारातील शेतात तानाजी बांगर यांचा आखाडा आहे. २३ फेब्रुवारी रोजी या आखाड्यावर शिवम सुरेश कुरील (रा. हिंगोली) हे असताना सागर काळे, विकी काळे, अभय चव्हाण, अक्षय गिरी उर्फ भल्ला, करण राजपूत (सर्व रा. हिंगोली) हे आखाड्यावर आले. यावेळी पाचही जणांनी तलवार व कोयत्याने शिवम कुरील यांना मारहाण केली. लोखंडी रॉडनेही पायावर मारून जखमी केले. साक्षीदारालाही तलवार, कत्ती व रॉडने मारहाण केली.

दोन आरोपी निघाले पोलीस जमादाराची मुलेयाप्रकरणी दवाखान्यात उपचार घेऊन आल्यानंतर शिवम कुरील यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाचही जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच आरोपींनी पळ काढला. यातील सागर काळे, विकी काळे, करण राजपूत व अक्षय गिरी हे चार आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी चारही जणांच्या वॉटेंडचे बॅनर हिंगोलीच्या गांधी चौकात लावले आहे. यातील सागर काळे व विकी काळे हे दोन आरोपी हिंगोली पोलीस दलातील एका पोलीस अंमलदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. पाच पैकी दोन आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र इतर आरोपींचा पोलिसांना अद्याप शोध आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस