लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रेरक पदाच्या कारणावरून वाद झाल्याने मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना हिंगोली तालुक्यातील बेलुरा गुठ्ठे जि. प. शाळेत घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील बेलुरा गुठ्ठे येथील जि. प. शाळेत मुख्याध्यापक शेषराव दौलतराव जाधव हे शासकीय कामकाजासाठी जात असताना त्यांना दोन महिलांनी अडवून प्रेरक पदाच्या कारणावरून वाद घालत थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. व जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी मुख्याध्यापक शेषराव जाधव यांनी दिलेल्या प्रथम फिर्यादीवरून सविता भीमराव इंगोले, जानकाबाई बबन खडसे दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि एस. एस. केंद्रे करीत आहेत.तर पे्ररक पदाची आॅर्डर देण्याच्या कारणावरून सविता भीमराव इंगोले यांचा मुख्याध्यापक शेषराव जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केला. याप्रकरणी सविता इंगोले यांच्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याने शेषराव जाधव यांच्याविरूद्ध हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे करीत आहेत.
‘पदाच्या’ वादातून तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:57 PM