हिंगोली: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. परतलेला हा पाऊस कोमेजून जाणाऱ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.
सेनगावात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ही रिमझिम पाऊस सुरू होता. तालुक्यातील कहाकर पुसेगाव गोरेगाव आजेगाव या परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
कळमनुरी तालुक्यातही पहाटे दोन वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. तालुक्यातील दांडेगाव, नांदापूर, बाळापुर, डोंगरकडा वाकोडी या परिसरातही चांगला पाऊस झाला. हिंगोलीत काल रात्री 11 वाजेपासून पावसाने सुरुवात केली होती, आज सकाळी हिंगोली शहरासह परिसरातील विविध भागात चांगला पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. औंढा व परिसरातील अनेक गावांत रात्री 11 ते 12 पासून पावसाला सुरुवात झाली आहे. सदर पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा असल्याने याचा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अजूनही हा पाऊस सुरू आहे. येळेगाव सोळुंके जवळा बाजार परिसरातील पाऊस झाला. वसमत तालुक्यातील विविध भागातही पावसाने हजेरी लावली.
गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तालुकानिहाय हिंगोली 28, कळमनुरी 28, वसमत 24, औंढा 12, सेनगाव 25 मिलिमीटर अशी नोंद झाली आहे.