हिंगोली : जिल्ह्यात २३ ऑगस्ट रोजी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नसून, एक जण बरा झाला आहे.
अँटिजन चाचणीत हिंगोली १२८, वसमत ७९, कळमनुरी ९०, सेनगाव १२, औंढा २६ अशी २३५ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. तर आज आरटीपीसीआरचा एकही अहवाल आला नाही. बरे झाल्याने नवीन कोविड सेंटरमधून एकाला घरी सोडले. आजपर्यंत जिल्ह्यात १६०२२ रुग्ण आढळले. यापैकी १५६२८ बरे झाले. तर ३९२ जणांचा मृत्यू झाला. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाकडून रोज आकडेवारीत चुका होत असून, त्यामुळे रुग्ण किती दाखल व किती बरे, यावरून संशयास्पद स्थिती निर्माण होत आहे. आकडे लपविण्याची तर धडपड सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.