हिंगोली ते हट्टा या मार्गाची दुरवस्था झाली होती. जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. वाहनचालकांची गैरसोय लक्षात घेता या मार्गाचे काम हाती घेण्यात आले. जवळपास हे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर येणाऱ्या नाल्यावरही अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले आहेत. काही पुलांचे काम पूर्ण झाले असले तरी काही पुलांचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. हिंगोली शहराजवळील नर्सी फाटा ते आरटीओ कार्यालयादरम्यान रोडवरही पूल उभारण्यात आले आहेत. मात्र या पुलाच्या कठड्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. कठडे उभारण्यासाठी लोखंडी गजाळी लावण्यात आली. मात्र त्यावर सिमेंटचा थर दिला नाही. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंनी खड्डे पडल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन पुलाच्या कठड्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
सौर सिग्नलमुळे टळतोय धोका
हिंगोली ते औंढाकडे जाणाऱ्या नर्सी नामदेव फाटा टी पॉइंट परिसरातही रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर दुभाजक बसविण्यात येत आहेत. त्यामुळे औंढाकडून येणाऱ्या वाहनांना एकाच बाजूने वळविण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे समजावे म्हणून नर्सी नामदेवकडे जाणाऱ्या टी पॉइंट परिसरात सौर सिग्नल बसविण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंनी सिग्नल बसविण्यात आल्याने धोका टळण्यास मदत होत आहे.
फोटो =