पाणी उपलब्धतेची मागणी
हिंगोली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी नसल्यामुळे कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी मोठा त्रास होत आहे. बऱ्याच कार्यालयात पाणी नसल्यामुळे नागरिकांना तासंतास पाण्यावाचून राहावे लागत आहे. यामुळे शासकीय कार्यालयात पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी होत आहे.
रस्ता दुरूस्त करण्याची मागणी
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव - फाळेगाव फाट्यापर्यंत असणाऱ्या अडीच किमी रस्त्याचे अर्धवटच काम झाले आहे. सुमारे दीड किमीपर्यंत रस्ता व्यवस्थित असून एक किमीचे अंतर पूर्णपणे उखडलेले आहे. यामुळे एक किमीचा रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
हरभरा काढणीला आला वेग
कळमनुरी : तालुक्यातील शेतशिवारामध्ये शेतकरी व शेतमजुर हरभरा काढणीच्या कामात मग्न झालेला आहे. सध्या हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. खरीप पिकांपासून काहीच पदरी न पडल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकातील या पिकावर मोठी आशा लागली आहे.