स्वातंत्र्य सेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या ९८० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय संस्था आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दारू: मद्यपान कुटुंबासाठी घातक या विषयावर व्यसनमुक्ती चर्चासत्र वसमत येथे घेण्यात आले.
सर्वोदयचे माजी प्रदेश मंत्री विशाल अग्रवाल, नशाबंदी मंडळाच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष शुभदा सरोदे, माजी प्राचार्य के. व्ही. महाजन, व्ही. डी. बेंडके, केरबा अवधुतवार, सदाशिव अडकिणे, कमलकिशोर सोनी, शाहीर एल.जी. खंदारे, गंगाधर उबारे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. व्यसनमुक्तीपर गीते सादर करण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी समाजामध्ये विविध उपाययोजना करण्यात येतात. मनाचा संकल्प आणि प्रबोधनाशिवाय पर्याय नसल्याचे चर्चासत्रातून स्पष्ट झाले. तसेच ‘द’ दारूचा नसून ‘द’ दुधाचाच अशी शिकवण करण्याची गरज आहे. येत्या वर्षभरात व्यसनमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्यांचे विपुल प्रमाणात संघटन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी सांगितले.