लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील बाजारसमिती समोर एका दुचाकीस भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत शेतक-यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ फेबु्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.त्र्यंबक बाबाराव निळ्कंठे (३२) रा. सोडेगाव असे मयत शेतकºयांचे नाव आहे. ते हिंगोली येथे सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनीचा कार्यक्रम आटोपून येत होते. त्यांनी आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या हळदीच्या पिकाचे स्टॉल्स प्रदर्शनीत लावला होता. ते दुचाकी क्रमांक (एमएच-३१-ईएक्स-५७७९) कळमनुरीकडे निघाले असता बाजार समिती समोर नांदेडहुन हिंगोलीकडे भरधाव जाणाºया आरजे-०२-जीबी-२११६ या क्रमांकाच्या ट्रकने निळकंठे यांच्या दुचाकीस धड़क दिली. अपघातात ते जागीच ठार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातानंतर ट्रकचालकाने मात्र घटना स्थळावरून पलायन केले. प्रगतशील शेतकरी होतकरू तरुण त्र्यंबक निळकंठे यांना दोन मूली आहेत.गतिरोधक नाहीकळमनुरी येथील बाजारसमिती समोरील वळण रस्त्यावर गतिरोधक नसल्याने येथे नेहमीच अपघात होतात. जवळच केंब्रीज शाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांची येथून नेहमी वर्दळ असते. सा. बा.चे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ट्रकच्या धडकेत शेतक-याचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:44 AM