अँटिजन तपासणीत २९ जुलै रोजी हिंगोली २२, औंढा ६०, वसमत ९५, कळमनुरी ६५, सेनगाव १७ अशी एकूण २५९ जणांची चाचणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. तर, आरटीपीसीआर चाचणीत औंढा ५१, वसमत ३३, सेनगाव ५३ व हिंगोलीत २६ जणांची चाचणी केली. यात नर्सी नामदेव येथे एक रुग्ण आढळून आला. आज बरे झालेला एक रुग्ण नवीन कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आला. तर नवीन कोविड सेंटरमधीलच औंढा तालुक्यातील भोसी येथील ५० वर्षीय रुग्ण आज दगावला.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ हजार ९९२ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ५८५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला. तर ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर २ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी कळविले आहे.