लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला.हिंगोली जिल्ह्यात अवैध १० टक्के पीक कर्ज वाटप झाले. शेतकरी बँकेत गेल्यास त्याला जुन्या थकबाकीचा दाखला दिला जातो. एकीकडे कर्जमाफीचा अर्ज भरला तो ग्रीनलिस्टमध्ये आहे हे माहिती असताना नवे कर्ज न देण्यामागचे कोडे उलगडत नाही.अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. खात्यावर रक्कम जमा नाही. २६२ कोटींची कर्जमाफी झाली तरी कुणाला, असा सवालही वडकुते यांनी विचारला. शेतकºयांचा अंत पाहू नका, त्यांच्या संयमाचा बांध फुटणे कुणालाच परवडणे शक्य नाही. जगाचा पोशिंदा सरकारच्या धोरणामुळे भिकेकंगाल झाल्याचा आरोपही आ. वडकुते यांनी केली. हिंगोली शहरात चौदा वर्षीय मुलाचा भूमिगत गटार योजनेच्या खोदकामात बुडून मृत्यू झाला. या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी वडकुते यांनी केली तर यात देखरेख ठेवण्यात कमी पडलेल्या दोषींवर कारवाईची मागणी केली.मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याशी चर्चा करून संबंधितास मदत मिळवून देण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.हिंगोली जिल्ह्यात मागील काही काळात नुसत्या घोषणांचा पाऊस पडत आहे. कोणतेच विकास काम झाले नाही.शासनाकडे समस्या मांडली की, ती पूर्ण करण्याचे लगेच आश्वासन देतात. पुढे काहीच होत नाही, आम्ही यात तरी अच्छे दिन येतील काय, याचा शोध घेत असल्याचेही ते म्हणाले.यावेळी जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, माधवराव कोरडे, संजय दराडे, बी.डी. बांगर, शशिकांत वडकुते आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्जमाफी फसवीच-वडकुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:16 AM