शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:34 AM

व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत.हिंगोली येथील व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया यांनी सांगितले.भारतातील व्यापारास संरक्षण द्यावे, आॅनलाईन विक्री व्यवहार बंद करावा, व्यापारी विरोधी कायदे रद्द करा, वॉलमॉर्ट, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेशबंद करावा आदी मागण्यांसाठी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय येथील व्यापारी महासंघाने घेतला आहे. व्यापाºयांनी या बंदबाबत प्रशासनासही निवेदन दिले. तर व्यापाºयांनी यात सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.व्यापाºयांची बैठकवसमत : २८ सप्टेंबर रोजी आयोजित भारत बंदमध्ये वसमतचा सहभाग नोंदवण्यासाठी वसमतमध्ये व्यापाºयांची बैठक पार पडली. यावेळी सुभाष लालपोतू, नवीनकुमार चौकडा, मन्मथआप्पा बेले, दीपक कुल्थे, गजानन कापूसकरी, राजेंद्र लालपोतू, लक्ष्मीकांत कोसलगे, रमेश आदी पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते.बाळापुरातही आवाहनआखाडा बाळापूर : व्यापारी महासंघाने पुकारलेल्या भारत बंदमध्ये आखाडा बाळापूर येथील व्यापारी सहभागी होणार असून संपूर्ण व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवणार असल्याचे निवेदन व्यापारी असोसिएशनच्यावतीने पोलिसांना दिली आहे.व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास अमिलकंठवार, भैरूसेठ वर्मा यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.कळमनुरी बंदचे आवाहनकळमनुरी : विविध मागण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी व्यापाºयांच्या वतीने भारतबंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सहभागी होवून कळमनुरी बंदचे आवाहन येथील व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रकांत देशमुख, गजानन खोतकर, म. तनवीर नाईक, नंदकिशोर सारडा, अविनाश बुर्से, नरेंद्र रेखावार, सुहास गुंजकर, जावेद खान, म. साजीद आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड