लॅबमध्ये थेट विचारणा करण्यासाठी अनेकजण धडपडत असल्याचे दिसत होते. तेथेही एसआरएफ आयडी असेल आणि स्वॅब पोहोचले तरच माहिती मिळते. मात्र या लॅबपर्यंत हे स्वॅबच पोहोचले नव्हते. तिसऱ्या दिवशीही स्वॅब पोहोचत नसतील तर याचे अहवाल कधी मिळणार? हा प्रश्नच आहे. एवढ्या कालावधीत रुग्णांची प्रकृती आणखीच बिघडत असून याला जबाबदार कुणाला धरायचे? असा प्रश्न आहे.
याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, असा प्रकार घडत असेल तर ते गंभीर आहे. यामध्ये आजच आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील. ज्या दिवशीचे स्वॅब त्याच दिवशी प्रयोगशाळेत पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. शिवाय सध्या तीन शिफ्टमध्ये लॅबचे काम चालते. ते चार शिफ्टमध्ये करून अहवाल वेळेत येतील याची काळजी घेतली जाईल. यानंतरही ही समस्या राहिली तर कारवाई करावी लागेल.