लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिके, फळबागांच्या झालेल्या नुकसानचे पंचनामे करून हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यात तीन दिवसांच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, केळी, मोसंबी, संत्रा, पपई, आंबे आदी पिकांचे नुकसान झाले आहे.शेतातील पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून हेक्टरी ५0 हजार रुपये मदत देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनावर आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, प्रदेशचिटणीस अमर खानापुरे, अॅड.गयबाराव नाईक, धनंजय पाटील, रामराव जगताप, बापूराव बांगर, विनायकराव देशमुख, चंद्रकांत महाजन, कैलास साळुंके, अजय बांगर, रमेश जाधव, विलास गोरे, डॉ.रवि पाटील, ज्ञानेश्वर जाधव, अॅड.धनंजय झाडबुके, राजाराम खराटे, सुधीर राठोड, एस.बी.राठोड, नगरसेवक सुमेध मुळे, संदीप गोबाडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
हेक्टरी ५0 हजारांच्या मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:53 AM