लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना १७ मेपासून सुुरु झाला आहे. या महिन्या मुस्लिमा बांधव उपवास ठेवत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत.यामध्ये खरबूज, टरबूज, चिकू, पपई, नारळ, अंगूर, आंबा आदी प्रकारची फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. यंदाही इंधन दरवाढीमुळे उन्हाळी फळांचे भाव वाढल्याचे फळ विक्रेते खलील बागवान यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंदा रमजान महिना उन्हाळ्यातच आला असल्याने तहानेने जीव व्याकूळ होऊ नये म्हणून पहाटेच्या आहारात फळांचा सर्वाधिक वापर केला जातो.असे आहेत फळांचे दरटरबूज २० ते ३० रुपये किलो, पपई ४० रुपये किलो, अंगूर १०० रुपये कि., चिकू ४० रुपये कि., केळी ४० ते ५० रुपये डझन, सफरचंद १०० ते १२० रुपये किलो, नारळ ३० ते ४० रुपये नग, आंबा ५० पासून १०० रुपये किलो आदी प्रकारच्याही फळांचे भाव वाढलेले आहेत.
रमजाननिमित्त फळांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:35 AM