लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अजनीहून हिंगोलीमार्गे मुंबईला जाणारी रेल्वे आठवड्यातून एकच दिवस असून याचाही वेळ व्यवस्थित नसल्याने जनतेची कामे व्यवस्थित होत नसल्यामुळे या गाडीच्या फेºया वाढविण्याची मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.अजनी- मुंबई ही गाडी आठवड्यातून एकाच दिवस असून तीही शनिवारी दुपारी २ वाजता मुंबई येथील कुर्ला टर्मिनल येथे पोहोचते. या गाडीने जाणाºया प्रवाशांची मुंबई येथे या वेळेनुसार कोणतेच कामे व्यवस्थित होत नसल्याने ही गाडी आठवड्यातून चार वेळा सोडून ती सकाळी लवकर मुंबई येथे पोहचावी अशी मागणी केली. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली.यावर रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. असे झाल्यास हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील जनतेस मुंबई, औरंगाबाद येथे जाण्यास सोयीस्कर होणार आहे. काही दिवसांपासून भाजप सरचिटणीस गोवर्धन विरकुंवर हे आ.मुटकुळे यांच्याकडे या रेल्वेफेºयांसाठी प्रयत्न करीत होते.
अजनी-मुंबई रेल्वे फेऱ्या वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:46 AM