पांडुरंग सखाराम मोरे शाखा अभियंता पूर्णा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करणे व संबंधितावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन ७ जानेवारी रोजी औंढा नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्याकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. पांडुरंग सखाराम मोरे शाखा अभियंता पूर्णा ग्रामपंचायत निवडणूक २०२१ च्या कार्यावर होते. कार्यरत असताना त्यांचा ५ जानेवारी रोजी पूर्णा नदीच्या पुलाखाली बेवारस मृतदेह आढळला. निवडणूक कामाच्या कार्यावर असताना एका इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू होणे, हे खेददायक आहे. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. सदरील निवेदनावर काळूराम कुरुडे अध्यक्ष, स्वप्नील बुरकुले उपाध्यक्ष, तुकाराम बेले सचिव, सदाशिव मोरे कोषाध्यक्ष, बालाजी ठोंबरे सहकोषाध्यक्ष ,लक्ष्मण कुरुडे ,दत्तराव ठोंबरे, अविनाश बुरकुले, संतोष ठोंबरे, तुकाराम जटाळे आदींच्या सह्या असून निवेदन देतेवेळी ते हजर होते.
शाखा मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:39 AM