सेनगाव तालुक्यातील आजेगाव ते सिंदेफळ शिवरस्त्यावरून सिंदेफळ शिवारातील पन्नासच्या वर शेतकऱ्यांना शेतात ये-जा करावी लागते. मात्र, काही दिवसांपासून शिवरस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी काटेरी झुडपे वाढली असून अनेक ठिकाणी नाले पडले आहेत. त्यामुळे शिवरस्त्यावरून ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे. आजेगाव शिवारातील काही शेतकऱ्यांना दुसरा मोठा रस्ता असल्याने यातील काही शेतकरी शिवरस्त्याला आडकाठी आणत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आजेगाव ते सिंदेफळ हा शिवरस्ता खुला करून शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर एकनाथ भालेराव, गजानन भालेराव, भागवत लांडे, परमेश्वर लांडे, माधव लांडे, नामदेव लांडे, विठ्ठल लांडे, नारायण डाळ, जानकीराम भैराने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आजेगाव ते सिंदेफळ शिवरस्ता खुला करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:22 AM