वन्यप्राण्यांचा उपद्रव
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावात वन्यप्राणी घुसत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सकाळी सकाळी शेतशिवारात रोही, रानडुकरांसह हरणांचा कळप घुसून पिकांची मोठी नासाडी करीत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
नालीवर ढापा बसविण्याची मागणी
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या गावातील अनेक नाल्यांवर ढापा नसल्याचे दिसून येत आहे. या नालीवर ढापा नसल्याने अनेकदा रात्रीच्या वेळ वाहनांसह नागरिकांचे पाय यामध्ये फसून खाली पडण्याच्या घटना घडल्या आहे. मागील ४ ते ५ महिन्यांपासून नालीवर ढापा नसल्यामुळे गावातील नागरिकांना अनेकदा या गैरसोयीचा सामना करावा लागला. गावातील नाल्यांवर ढापा बसविण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.