हिंगोली : रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांचे गुरुवारी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाव्यवस्थापक माल्या यांनी ८ जुलै रोजी हिंगोली रेल्वे स्थानकाला भेट दिली.
यावेळी महाव्यवस्थापक माल्या व डीआरएम उपेंद्र यांचा जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाव्यवस्थापक माल्या यांच्यासोबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. याच दरम्यान, जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने औरंगाबाद ते नागपूर द्वारा जालना, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, मूर्तीजापूर, बडनेरा, पूलगाव, वर्धा ही इंटरसिटी एक्स्प्रेस स्रू करण्यात यावी, अकोट-पूर्णा डेमू रेल्वे गाडी नांदेडपर्यंत सुरू करावी या मागणीचे निवेदन महाव्यवस्थापक माल्या यांना देण्यात आले. लवकरात लवकर ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासनही यावेळी रेल्वे व्यवस्थापकांनी दिले.
महाव्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनावर दीपक लदनिया, नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी, कैलास काबरा, गजेंद्र बियाणी, प्रशांत सोनी, सुमित चौधरी, रवी सोनी, संजय देवडा, मधुर भंसाळी, सागर दुबे, एस. के. मझर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो न. १८