लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ: शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली औंढा येथील तहसिल कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.औंढा नागनाथ तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तालुक्यात रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावी, मागेल त्या शेतकºयाला सिंचन विहीर द्याव्यात, जळालेले डीपी विनाविलंब व विनाअट बदलून द्यावेत, स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सामान्य नागरिकांचा होणारा अपमान व दमदाटी थांबवावी, कृषी विभागाकडून देण्यात येणारे यांत्रिकरणातील अवजारे शेतकºयांना द्यावीत यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अजय मुंदडा, अंकुश आहेर, भीमराव भगत, रामप्रसाद कदम, श्रीशैल्य स्वामी, माऊली झटे, जी. डी. मुळे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोहनराव बोथिकर यांना दिले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र सांगळे, राजाभाऊ मुसळे, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:24 AM