संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकेकाळी हिंगोलीच्या नाट्यचळवळीच्या उभारीचे साक्षीदार ठरलेले इंदिरा खुले नाट्यगृह आता काळाच्या पडद्याआडच गेले. राज्यातील अनेक नामवंत कलाकारांनी येथे आपली कला सादर केली. त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मात्र नाट्यगृहाची दुरुस्ती करून त्याचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी ते मृत्यूशय्येवरच गेले आहे. तर अनेक वक्त्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या कै. शिवाजीराव देशमुख सभागृहाला तर कोणी वालीच उरला नाही.शहरातील इंदिरा खुले नाट्यगृहात जादूगार भैरु, विविध प्रकारची नाटके, एकांकिका, छगन भुजबळ, राज ठाकरे यांच्या सभेसह इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची आठवण नागरिक सांगतात. तसेच येथे पार पडलेल्या विवाहाच्या निमंत्रण पत्रिकाही अनेकांनी जपून ठेवल्या आहेत.अतिमहत्त्वाचे म्हणजे श्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिका समिती निर्मित्त प्रा. कालिदास कुलकर्णी दिग्दर्शित ‘थेंब थेंब आभाळ’ हे दोन अंकी नाटक नांदेड विभागातून प्रथम पारितोषिक घेऊन मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात त्याचे सादरीकरण करुन राज्यातून द्वितीय पारितोषीकास पात्र ठरले होते. तसेच ‘खंडोबाच लगीन’ हे नाटकसुद्धा विभागातून द्वितीय पारितोषिकास पात्र ठरले होते.हिंगोली जिल्ह्यात नवोदित कलावंताची संख्या जास्त आहे. मात्र त्यांना हिंगोलीच्या ठिकाणी व्यासपीठच मिळत नसल्याने चांगले कलावंत घडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या नाट्यगृहात श्रीपाद नृसिंह बेंडे एकांकिका स्पर्धा सलग ३० वर्ष सुरु होत्या. या स्पर्धेच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे, नंदू माधव, संजय सुगावकर, धनंजय देशपांडे, कुलदीप धुमाळ, नाथा चितळे, संघर्ष कºहाळे आदी नावाजलेले नायक एकांकिका स्पर्धेतून घडलेले आहेत.या नाट्यगृहात अशोक सराफ, दादा कोंडके, निळू फुले, उषा चव्हाण, वर्षा उसंगावकर, लालन सारंग, कमलाकर सोनटक्के, सुनील शेंडे, महेश मांजरेकर, लेखक सतीश आळेकर, दा. सु. वैद्य, रोहिणी हट्टंगडी, पिंपरीकर या कलावंतांनी सादरीकरण केलेले आहे.एवढ्या मोठ्या कलाकारांच्या स्मृति जागवणारे, त्याला उजाळा देणारे नाव असून इंदिरा खुले नाट्यगृह वादात सापडून कामच ठप्प व्हावे, हे हिंगोलीकरांचे दुर्देव आहे. वºहाड निघालय लंडनला प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच नाटक तर या ठिकाणी खुप गाजल होत. तसेच सलग तीन वर्षे लोकमतच्या माध्यमातूनही येथे हौसी कलावंताना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. पालिका ठरावीक भागात शहर स्वच्छतेकडे लक्ष देत आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र सांस्कृतिक ठेवाही जतन करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्हानिर्मितीपासून येथे एकही मोठी सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा झाली नाही. त्यामुळे पूर्वीचाच काळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ आल्याचे उपहासात्मक बोलले जाते.नाट्यगृहाचे उद्घाटन होऊन ३६ वर्ष लोटलेमोठ्या उत्साहात उभारण्यात आलेल्या इंदिरा खुले नाट्यगृहाचे उद्घाटन सन १९८१ मध्ये केंद्रीय शिक्षण व समाज कल्याणमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री शिवराज पाटील, शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती होती. आता नाट्यगृह दुर्लक्षित होत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील कलाक ारांचा हिरमोड होत चालला आहे. यासाठी कोणताही पुढारी, पालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पाठपुरावा घेत नसल्याने कलाकारांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराच्या विकासात उनिव भासत आहे.
हिंगोली शहरातील नाट्यगृह हरवल्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:49 PM
एकेकाळी हिंगोलीच्या नाट्यचळवळीच्या उभारीचे साक्षीदार ठरलेले इंदिरा खुले नाट्यगृह आता काळाच्या पडद्याआडच गेले. राज्यातील अनेक नामवंत कलाकारांनी येथे आपली कला सादर केली. त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मात्र नाट्यगृहाची दुरुस्ती करून त्याचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी ते मृत्यूशय्येवरच गेले आहे.
ठळक मुद्देहिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडले बांधकाम; पालिका पदाधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष