लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ६ ते १९ मे या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण गावात गृहभेटी देऊन संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे. जिल्ह्यातील १४११ क्षयरूग्ण सध्या उपचाराखाली आहेत.जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्रत्यक्ष क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविली जाणार असून त्या अनुषंगाने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी.तुम्मोड व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ६ मे रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तुम्मोड म्हणाले की, जिल्हाभरात क्षयरूग्ण शोध मोहीम राबवून जास्तीत-जास्त क्षयरुग्ण शोधून काढावेत. त्यांना उपचाराखाली आणावे. जिल्ह्यातील नागरिकांनीही या मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ. पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपस्थित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मोहिम यशस्वीपणे व काटेकोरपणे राबविण्यात यावी असे सांगितले.जिल्ह्यात ६ ते १९ मे या कालावधीत आरोग्य विभागातर्फे संशयित क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचााखाली आणले जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील १४११ क्षयरूग्ण उपचाराखाली आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका,यांच्यामार्फत गृहभेटी दरम्यान संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणले जाईल, असे सांगितले.४मोहिमेदरम्यान संबधित आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदाºया पार पाडाव्यात, असेही सांगितले.
जिल्ह्यातील संशयित क्षयरूग्णांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:26 AM