लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खा. राजीव सातव यांनी २० सप्टेंबर रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र येथे आढावा सभा घेतली.यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते यांच्यासह ग्लोबल हेल्थ स्टॅटर्जिस नवी दिल्लीचे रमण संकर, तानिया धाडानी, दिव्या विद्यानाथन आदी उपिस्थत होते. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी क्षयरोग विभागाचा आढावा सादर केला. खा. सातव यांनी जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक, औषधी विक्रेते, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जनजागरण मोहीम हाती घेऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता असून जिल्हा क्षयरोगमुक्तसाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सातव यांनी सांगितले. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना सोबत घेण्यास क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या सहकार्याने प्रत्येक क्षयरोग रूग्णांची माहिती आॅनलाइन सादर करण्यास मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे खा. सातव यांनी सांगितले. ग्लोबल हेल्थ स्टॅर्टजीसचे रमण शंकर यांनी देखील राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील, असे सांगितले. दिव्या विश्वनाथन यांनी क्षयरोगाबाबत जनजागरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा रूग्णालयाचे डॉ. मंगेश टेहरे, डॉ. कोरडे, डॉ. गोपाल कदम, डॉ. राठोड, डॉ. नगरे, प्रशांत तुपकरी आदी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी क्षयरोग विभागाचे डॉ. जी. एस. मिरदुडे, सुनील शिरफुले, सावन शिंदे, प्रसाद कुलकर्णी, संतोष क्षीरसागर, दीपक पवार, अशोक डुकरे, प्रणिता सोमानी, रवि घुगे, गजानन आघाव, बालाजी उबाळे, योगेश घोंगडे, आर. टी. पुंडगे, आर. डी. भोसले, घावडे, बोथरा, माने, डोल्हारे, जायभाये आदींनी परिश्रम घेतले.
जिल्हा क्षयरोग मुक्तीसाठी निर्धार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:12 AM