शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

‘विद्यार्थ्यांच्या मुलभूत संकल्पना विकसित करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 11:28 PM

वर्गातील प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना विकसीत करा, राज्यातील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी सहकार्य करा, १०० टक्के मुले प्रगत करा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वर्गातील प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना विकसीत करा, राज्यातील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी सहकार्य करा, १०० टक्के मुले प्रगत करा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.शिक्षण विभाग व डाएटच्या वतीने जि.प. प्रशालेच्या मैदानावर प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमात शिक्षक सुसंवाद कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, डी.के. इंगोले, शिक्षण तज्ज्ञ सिद्धेश वाडकर, श्याम मकरमपुरे, प्राचार्य गणेश शिंदे, गट शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, दत्ता नांदे, जगताप आदी उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, गणित विषयाकडे आमचे लक्ष नाही, गणिताची भिती का? वर्गात मोजके बोला विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना समजण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवा, शैक्षणिक साहित्याचा वापर करा, गणिताची एखादी मुलभूत क्रिया न येताच मोठे अधिकारी होता येते हे उदाहरणासह त्यांनी पटवून दिले. पहिली, दुसरीतच विद्यार्थ्यांच्या मुलभूत संकल्पना विकसित करा, गुणवत्ता ७५ टक्के येणे याला गुणवत्ता म्हणत नाहीत. विद्यार्थ्यांनी विषयातील संकल्पना समजल्यानंतर आपोआपच गुणवत्ता १०० टक्के येते. चौथ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के मुलभूत संकल्पना आलीच पाहिजे. पहिली, दुसरीत मुलगा कच्चा राहिला तर आयुष्यात तो कच्चाच राहतो. अधिकाºयांनी मार्गदर्शकांची नाही तर सुलभकांची भूमिका स्वीकारली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी शैक्षणिक अ‍ॅप उर्दु नजमेचे अनावरण झाले. शाळेतील गुणवत्तेचे सादरीकरण केशव खटींग, देविदास गुंजकर यांनी केले. सुसंवाद कार्यक्रमात नंदकुमार यांनी मोकळ्या मनाने शिक्षकांशी संवाद साधला. गुणवत्तेत राज्याला देशात प्रथम क्रमांकावर आणण्याचे ध्येय आहे. अनेक देशात १०० टक्के मुले प्रगत आहेत. आपल्या राज्यातही असे झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.शिक्षक ताटकळलेसाडेबारा वाजता सचिव नंदकुमार हे कार्यक्रमाला येणार होते. प्रत्यक्षात ते साडेतीनला आले. त्यामुळे शिक्षक बाहेरच फिरू लागल्याने त्यांच्या मागे फिरण्याची कवायत शिक्षणाधिकारी करीत होते. तर मंडपही अपुरा पडल्याने अनेकांना उभे राहूनच मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा लागला. सेल्फी काढण्याची धडपड एवढी की, नंदकुमार हे कोणत्या मार्गाने येणार यावरूनच गोंधळाचे वातावरण होते.