संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील रिसाला बाजार भागात असलेल्या सिरेहक शहा बाबा दर्गाह सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी संदल मिरवणुकीसाठी जिल्ह्यासह बाहेर गावावरुन भाविक येतात. दर्गा परिसरात आल्यानंतर वयोवृद्ध बाबांच्या चमत्कारांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. या ठिकाणी अद्याप कोणत्याही सुशोभिकरणाचा अभाव असला तरीही निसर्गानेच ही उणीव भरून काढली आहे.शहराच्या अगदी एका टोकाला असलेला सिरेहक शहा बाबा दर्गाह परिसर अतिशय रमणीय ठिकाण आहे. बाजूला असलेल्या तलावामुळे या ठिकाणी उच्च तापमानातही गारवा जाणवतो. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाली आहे. हा दर्गाह अगदी प्राचीन काळापासून आहे.वयोवृद्ध बाबांचे अनेक चमत्कार सांगातात. एक वेळ तर हिरालाल गवळी नावाची व्यक्ती गारमाळ येथून हिंगोलीतील बाजारात मदिना विक्रीसाठी घेऊन जात होती. त्याकाळात निजामाची हुकूमत असल्याने निजामाची सर्वांना भीती होती. तर निजामकालीन पोलिसांनी मदिना घेऊन जाणाºया गवळीस रस्त्यात अडवून पिंपात काय घेऊन जातोस याची विचारणा केली. त्यामुळे सदर व्यक्तीने घाबरून बाजारात दूध विक्रीस घेऊन जात आहे, असे सांगितल्यावरही निजामकालीन पोलिसांचा त्यावर विश्वास न बसल्याने त्यांनी पिंप उघडून बघितला असता त्यात खरोखर दूध तयार झालेले दिसले. त्यामुळे त्या इसमास सोडून दिल्याचाही चमत्कार सांगितला जातो. तेव्हापासून गवळी समाज तर या दर्गाहला जास्त मानतोच; परंतु सर्वच धर्मातील लोक मोठ्या श्रद्धेने येथे येतात. दर्गा कमेटीचे अध्यक्षपदही वंश परंपरेनुसार सुरेशअप्पा सराफ यांच्या घराण्यात आहे. अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. तर येथे २६ एप्रिल रोजी कव्वालीचाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी दर्गा खादीम शौकत खान, सुरेशअप्पा सराफ, बिरजू यादव, अनवर पठाण (पहेलवान), आजम खॉ, शेख सरवर बेलदार आदी परिश्रम घेत आहेत.२५ एप्रिल पासून संदलला विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त दर्गा परिसरात रोज सायंकाळी अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ते यंदाही कायम आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दर्शनासाठी येणाºयांची गर्दी दरवर्षी वाढत असून, अनेकांच्या मनोकामनाही पूर्ण होतात. त्यामुळे येथे नवसही फेडले जातात, असे भाविकांतून सांगितले जाते. तर फकीर, फुकरा, सतावलिया यांचेही हे श्रद्धास्थान आहे. तर काही आखाड्यावरील फकीर या ठिकाणी येतात. मंगळूर येथील कमलशहा बरहेना, इसापूर धरण येथील मुशीर बाबा येथे अनेक वर्र्षांपासून हजेरी लावतात.
भाविकांचे श्रद्धास्थान सिरहेकशहा बाबा दर्गाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:05 AM